धुळे: राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने जुनी महानगरपालिकेसमोर "महायुतीच्या काळ्या कारणामाची दहीहंडी"
Dhule, Dhule | Aug 26, 2024 धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने युती सरकार विरोधात "महायुतीचे काळे कारणामे" यावरून प्रतिकात्मक दहीहंडी साजरी करून निषेध व्यक्त केला. दिल्लीच्या समोर महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचं काम हे युती सरकार करीत आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे काळे कारनामे जनतेसमोर यावे म्हणून आज सोमवारी रोजी हे अनोख्या पद्धतीने काळे फुगे लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने दहीहंडीचा कार्यक्रम घेतला.