जालना: जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली; 5,000 रुपयांच्या मदतीवर नाराजी
Jalna, Jalna | Nov 7, 2026 जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 6 नोव्हेंबरला बदनापूर तहसील कार्यालयासमोर चुलीवर बेसन-भाकरी करून काळी दिवाळी साजरी केली. शासनाच्या 5,000 रुपयांच्या अग्रीम मदतीवर नाराजी व्यक्त करत 25,000 रुपये अग्रीम मदत, नुकसानभरपाई आणि पीकविम्या तातडीने देण्याची मागणी केली आहे.