नागपूर ग्रामीण: वाडित भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चालक जागीच मृत; मित्र किरकोळ जखमी
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोबननगर-खडगाव रोडवर भरधाव दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत पावल्याची घटना घडली आहे. शेरसिंग दिपसिंग उईके हा आपल्या मित्रासह दुचाकीवरून जात होता. 'द विदर्भ टोटल लॉजिस्टिक' दुकानासमोर त्याने ताब्यातील दुचाकी भरधाव, निष्काळजी व धोकादायक रीतीने चालवल्यामुळे गाडीचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून दोघेही खाली पडल.