नाशिक: गंभीरित्या भाजल्याने औषध उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची घटना भुजबळ फार्म जवळ घडली
Nashik, Nashik | Oct 14, 2025 गंभीरित्या भाजल्याने औषध उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची घटना भुजबळ फार्म जवळ, सिडको भागात घडली असून अंबड पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मनोज वामन करणार वय 57 राहणार साखरी जिल्हा धुळे हे सिडको भागातील भुजबळ फार्म जवळ शेतात काम करीत असताना शेतातील कचऱ्याला पेट्रोलच्या साह्याने आग लावली असता शेजारी ठेवलेल्या पेट्रोलच्या कॅनचा मोठा भडका झाला व त्यात ते गंभीरित्या भाजल्याने औषध उपचारादरम्यान मृत्यू झाला.