भोकरदन: मा.जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे यांनी घेतली गायिका कडूबाई खरात यांची छ.संभाजी नगर हिनानगर येथे निवासस्थानी भेट
आज दिनांक 20 जुलै 2025 वार रविवार रोजी रात्री 8 वाजता भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथील रहिवासी असलेल्या व भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे यांनी प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांची छत्रपती संभाजीनगर येथील इना नगर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे याप्रसंगी गायिका कडू ताई खरात यांनी शाल श्रीफळ देऊन आशाताई पांडे यांचे स्वागत केले आहे व सामाजिक व गायन क्षेत्रात विविध मुद्द्यावर अर्धा तास चर्चा सुद्धा केली आहे.