सेलू: शहरात क्षुल्लक कारणातून महिलेस जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Oct 5, 2024 घरासमोर सुरू असलेला वाद पाहण्यास बाहेर आलेल्या मायलेकीला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची घटना ता. 3 गुरुवारी सायंकाळी 7 वाजता सेलू येथे घडली. याप्रकरणी नलिता मनीष दाभाडे रा. सेलू यांनी दीपक रामटेके रा. सेलू याचे विरुद्ध ता. 4 शुक्रवारला दुपारी 2.30 वाजता पोलिसांत तक्रार दाखल केली. अशी माहिती आज शनिवारी ता. 5 ला सेलू पोलिसांनी दिली.