पुसद: मविआने नगराध्यक्ष मुस्लिम चेहरा न दिल्यास एमआयएम पूर्ण ताकदीने निवडणूक आखाड्यात उतरणार
महाविकास आघाडी धर्मनिरपेक्ष असल्याने महाविकास आघाडी कडून नगराध्यक्ष पदासाठी मुस्लिम चेहरा द्यावा अशी आग्रही भूमिका असून महाविकास आघाडीने योग्य विचार न केल्यास एमआयएम पूर्ण ताकदीनिशी निवडणूक आखाड्यात उतरणार असल्याची प्रतिक्रिया एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद इरफान यांनी दिली.