उत्तर सोलापूर: पूरग्रस्त गावांना चक्क जिल्हाधिकारींची ट्रॅक्टरद्वारे भेट; वाकवसह विविध गावात भेट देऊन शेतकऱ्यांना दिला धीर...
माढा तालुक्यातील केवड व वाकाव ही अतिवृष्टी व पुराने बाधित गावं असून,पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज दूपारी या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.गावांना जोडणारे रस्ते चिखलमय झालेले असून त्या ठिकाणी नियमित वाहने जाऊ शकत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टर मधून गावांमध्ये व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पिकांच्या पाहणी केली.