रोहा: रोह्यात प्रयोगशील शेतीचा यशस्वी प्रयोग
Roha, Raigad | Mar 26, 2026 रोहा तालुक्यातील बाहे हे गाव भाजीपालासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. पारंपारिक लागवडीपासून विविध प्रयोग करीत आज येथील शेतकरी शेतीतून चांगले उत्पादन काढून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. यातीलच बाहे येथील प्रयोगशील शेतकरी खेळु थिटे यांनी कमी जागेत शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करून मिरची पिकातून भरघोस उत्पादन काढत आहेत. त्यांचा झालेला यशस्वी प्रयोग नवीन शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.