हवेली: अखेर तक्रारीनंतर वाघोली येथे पुणे नगर महामार्गावर सर्रासपणे वेश्या व्यवसाय करणा-या महिलांवर पोलीसांची कारवाई
Haveli, Pune | Nov 30, 2025 वाघोली येथे पुणे नगर महामार्गावर खांदवे नगर ते कावेरी हॉटेल दरम्यान सर्रासपणे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभे राहिलेल्या असतात. या प्रकरणी नागरिकांना विशेषतः कामानिमित्त येथुन जाणाऱ्या महिलांना त्रास होत होता. या प्रकरणी वाघोली पोलीसांनी कारवाई केली आहे. समाजसेवक सुभाष जाधव यांनी या संदर्भात पोलीसांकडे तक्रार केली होती.