दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचुर येथील श्री सेवालाल प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेज शंकरनगर येथे सोलापूर सोशल फाउंडेशन व मेघराज राठोड फाउंडेशनच्या वतीने आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी 11 वाजता १००१ वृक्षाचे रोपण व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देशमुख यांच्या हस्ते वही वाटप करण्यात आले. यावेळी विंचूर-शंकरनगर, निंबर्गी या रस्त्याच्या दुतर्फा १००१ वड आणि पिंपळचे वृक्षारोपण करण्यात आले.