येवती येथील शेत शिवारात वैभव निरंजन वानखडे नावाच्या 28 वर्षीय युवकाने, विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दिनांक एक जानेवारीला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना प्राप्त होताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळ पंचनामा कार्यवाही केल्यानंतर, आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे