ग्रामस्थ आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या तक्रारींवर प्रशासनाची ठोस कार्यवाही.बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील गोहगाव दांदडे या गावातील ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) श्री. विजयकुमार रामेश्वर धोंडगे यांच्यावर अखेर शिस्तभंगात्मक कारवाई करत निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. अरविंद दांदडे व ग्रामस्थांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारीवरून करण्यात आली.