स्तनाचा कर्करोग वेळीच ओळखा, आरोग्याची काळजी घ्या !
स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात
54 views | Parbhani, Maharashtra | Oct 20, 2026 स्तनाचा कर्करोग वेळीच ओळखा, आरोग्याची काळजी घ्या ! स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे स्तनांमध्ये गाठ जाणवणे, आकारात बदल होणे, स्तनाग्रातून स्राव येणे किंवा त्वचेत बदल दिसणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, नियमित तपासणीला प्राधान्य द्यावे आणि कोणतीही शंका असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आयुष्मान भारत आरोग्य मंदिरासह जवळच्या आरोग्य केंद्रात उपलब्ध सुविधांची माहिती घ्या आणि आवश्यकतेनुसार तपासणी करून घ्या. स्तनाच्या कर्करोगाविषयीचे गैरसमज दूर करूया, जागरूकता वाढवूया आणि महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देऊया. वेळीच निदान, योग्य उपचार, निरोगी आयुष्याचा विश्वास ! #स्तन कर्करोग जागरूकता #स्तनकर्करोगजागरूकतामहिना #प्रकाशअबिटकर #महिलाआरोग्य #सार्वजनिकआरोग्य #स्तन कर्करोग