*अंतुर्ली येथे अज्ञात व्यक्तीने दुचाकी जाळली* मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे एका अज्ञात व्यक्तीने बाहेरपुरा येथील रहिवासी जावेद खान रशीद खान च्या मालकीची दुचाकी रात्रीच्या वेळेस लॉक करून बाहेर घरासमोर लावलेली होती. हिरो कंपनीची मोटर सायकल क्र.एम. एच. 19डी. ए.8719 या गाडीला जाळले. गाडीला जेव्हा मोठी आग लागली व धूर निघाला तेव्हा शेजारी राहणाऱ्यानी जावेद खानला जागे केले. सर्वं शेजारी मिळवून आग विझवण्यात आली. घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली.