यवतमाळ: खेड्या पाड्यातील विद्यार्थ्यांची विमानवारी साठी उत्सुकता शिगेला ;जिल्ह्यातील 5764विद्यार्थांनी दिली तालुकास्तरीय महादीप
यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन व स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी व स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी टिकावा यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पाचव्या वर्षी महादीप परीक्षेचे आयोजन केले आहे.महादिप परीक्षेतून विमान वारी अशी अनोखी ओळख या परीक्षेची आहे. त्यामूळे खेड्या पाड्यातील विदयार्थ्यांना विमानवारी साठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.