जालना: मनोज जरांगे यांना मोठा धक्का; कोअर कमिटीतील सदस्याचा 4 कोटी 90 लाखांचा वाळू दंड कायम; गोदावरी नदीतून 2 हजार ब्रास उत्खनन
Jalna, Jalna | Sep 28, 2026 गोदावरी नदीपात्रातून सुमारे 2 हजार ब्रास अवैध वाळू उत्खनन केल्याच्या प्रकरणात संजय कटारे यांच्यावर आकारण्यात आलेला 4 कोटी 90 लाख रुपयांचा दंड कायम ठेवण्यात आला आहे. या दंडाची रक्कम वसूल करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार दि.28 सप्टेंबर 2026 रोजी स. 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची सुरुवात अजय महाराज बारस्कर यांनी केलेल्या तक्रारीनंतर झाली. गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन झाल्याच्या तक्रारी आहे.