वर्धा: माजी सैनिक दर्जा व पेन्शन नसलेल्या सैनिकांनी संपर्क करण्याचे आवाहन
Wardha, Wardha | Jan 23, 2026 जिल्ह्यातील ज्या सैनिकांना माजी सैनिक दर्जा नाही. तसेच ज्यांना कोणतेही निवृत्ती वेतन मिळत नाही, अशा 65 वर्षावरील सैनिक व त्यांच्या विधवांनी आपल्या सेवेच्या तपशिलासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वर्धा येथे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीपती मोरे यांनी दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास केले आहे.