नागपूर ग्रामीण: थरारक! केंद्रीय शाळेत वर्गाच्या खिडकीवर आढळला विषारी रसेल वायपर!
केंद्रीय शाळेच्या वर्गातील खिडकीजवळ एक अत्यंत विषारी 'रसेल वायपर' साप आढळल्याने खळबळ उडाली. शाळा सुरू असताना हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र आकाश मेश्राम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अत्यंत कौशल्याने व सुरक्षितपणे या विषारी सापाला जेरबंद केले. पकडलेल्या सापाला त्यानंतर सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.