मराठी भाषा दिनानिमित्त ग्रामीण पोलीस दलाची मराठीत कामकाज करण्याची शपथ
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 27, 2026
आज दि 27 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता मराठी भाषा गौरव दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस आयुक्तालयात विविध उपक्रमांचे आयोजन करत हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपारिक पोशाख परिधान करून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ग्रंथ दिंडी काढली. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या ग्रंथदिंडीत मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. यावेळी ग्रामीण पोलीस आयुक्त विनय कुमार राठोड यांच्या उपस्थितीत मराठी भाषेचा गौरव करण्याचा संकल्प करण्यात आला. ग्रामीण भागातील सर्व पोलीस ठा