समुद्रपूर: समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करणे हेच झाले मुळ उदिष्ट:आमदार समिरभाऊ कुणावार
समुद्रपुर तालुक्यातील रामनगर येथे आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या पुढाकाराने महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आणि मुख्यमंत्री १०० दिवस (७ कलमी) कार्यक्रमांतर्गत क्षेत्रभेट व समस्या निराकरण शिबीर व आमदार आपले दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहमान, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार कपिल हाटकर,गटविकास अधिकारी रोशनकुमार दुबे प्रामुख्याने उपस्थित होते.