मोर्शी: विचोरी येथील सुरेंद्र देशमुख विद्यालय, माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न
आज दिनांक 28 डिसेंबरला दुपारी बारा वाजता विचोरी येथील, सुरेंद्र देशमुख विद्यालयात या विद्यालयातून शिकून गेलेल्या,माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक राऊत सर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित राहून, शालेय जीवनातील कडू गोड आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला. सर्व मान्यवर तथा शिक्षक वृंदांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात हा सोहळा संपन्न झाला