अंबड: अंबड–बीड रोडवर भीषण अपघात; १२ टायर ट्रक चालक जागीच ठार
Ambad, Jalna | May 9, 2026 अंबड–बीड रोडवर भीषण अपघात; १२ टायर ट्रक चालक जागीच ठार अंबड | प्रतिनिधी अंबड–बीड रोडवर आज रात्री भीषण अपघात घडून १२ टायर ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. ही दुर्घटना रामनगर पाटीजवळ रात्री अंदाजे ८:४५ ते ९ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जालन्याकडून बीडकडे लोखंडाचा कच्चा माल घेऊन जाणारा १२ टायर ट्रक (क्रमांक MH 09 GJ 3109) भरधाव वेगात असताना रामनगर पाटीजवळील विद्युत खांबावर जोरदार धडकला. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक घटना