महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या किमान समान कार्यक्रमानुसार एड्स या आजाराबाबत जनजागृतीसाठी लातूर कारागृह येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर जिल्हा न्यायालय व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.