यवतमाळ: प्राणघातक हल्ल्यातील आरोपीची आज न्यायालयामध्ये होणार पेशी,जांब मार्गावर घडली होती घटना
भेटायला न आल्याच्या कारणातून एका महिलेवर चाकूने प्राण घातक हल्ला केल्याची घटना जांब मार्गावर घडली होती. या प्रकरणी आरोपी जयराम पवार याला अवधुतवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयामध्ये हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.त्याची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्याची पुन्हा एकदा आज न्यायालयामध्ये पेशी होणार आहे.