वसई: नालासोपारा पश्चिमेच्या खंबाळेश्वर मंदिर जवळील चौधरीवाडी इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळून अपघात
Vasai, Palghar | Apr 21, 2024 नालासोपारा पश्चिमेच्या खंबाळेश्वर मंदिर जवळील चौधरीवाडी इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. यातून तीन जणांची सुखरूप सुटका केली आहे तर एक जण जखमी झाला आहे. नालासोपारा पश्चिमेच्या भागात खंबाळेश्वर मंदिर जवळील चौधरीवाडी येथे दोन मजली इमारत आहेत. शनिवारी रात्री अचानकपणे या इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला. या घटनेमुळे खळबळ उडाली होती.