अकोला, दि. २ नोव्हेंबर : शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या विशेष मोहिमेत बेशिस्त ऑटोचालकांवर कारवाई करून ६७ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. या कारवाईत एकूण ५७,१०० रु.दंड आकारण्यात आला असून २२,५००रु. वसूल करण्यात आले आहेत. चालकांना वाहतूक नियमांचे समुपदेशनही देण्यात आले. नागरिकांनी व ऑटोचालकांनी नियमांचे पालन करून शहरातील वाहतूक सुसूत्र ठेवावी, असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी केले असून ही माहिती दि. २ नोव्हेंबर, रोजी संध्याकाळी ७ वाजता त्यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे दिली आहे.