समुद्रपूर: रोड रस्ते आणि इमारती विकास नव्हे तर तळागाळातील दीनदुबळ्याला मदत करणे हा खरा विकास: आमदार समिरभाऊ कुणावार
रोड रस्ते इमारती बाधणे हा विकास नव्हे तर तळागाळातील दीनदुबळ्याला मदत करणे हा खरा विकास आहे.त्याच्या विकासासाठी माझी नेहमीच तळमळ आहे.असे मत आमदार समिरभाऊ कुणावार यांनी समुद्रपूर येथील २१८ लक्ष रुपयाचा सुसज्ज विश्रामगृहाच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केले या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक म्हणून आमदार समिरभाऊ कुणावार तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार कपिल हाटकर, किशोर दिघे, भुपेंद्र शहाणे, नगराध्यक्ष योगिता तुळणकर,आदी उपस्थित होते.