समुद्रपूर: तिर्थक्षेत्र साखरबाहुली रसत्यावर जीवघेणे खड्डे:तातडीने दुरुस्तीची स्थानिक नागरीक व भाविकांची मागणी # Jansamasya
समुद्रपूर तालुक्यातील साखरबाहुली येथील सुप्रसिद्ध हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून प्रख्यात असलेल्या हजरत बाबा शेख फरीद दर्ग्यावर रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र साखरबाहुली पाटी पासून गावापर्यंत जवळपास १ किलोमीटर अंतर असलेले रस्त्याची अत्यंत दैना अवस्था झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे.यामुळे या रस्त्याने वाहन कसे चालवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.तरी तातडीने संबंधित विभागाने रसत्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरीक व भाविकांनी केली आहे.