गेवर्धा येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 273 रुग्णांची तपासणी
कूरखेडा - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गेवर्धा यांच्या वतीने आयोजित आरोग्य निदान व मोफत औषध उपचार शिबिरात 273 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात रक्तातील साखर, रक्तदाब, हिमोग्लोबिन, थायरॉईड, CBC, मुखरोग, मलेरिया तसेच सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर रुग्णांना मोफत औषधे व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदिश बोरकर, डॉ. प्राजक्ता दुपारे यांच्यासह प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिबिरात सेवा दिली. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष दत्तूजी करणकर, सचिव धनंजय शेंडे तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.