समुद्रपूर: जाम येथे अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅमची सोन्याची चैन झटका मारुन नेली चोरुन; समुद्रपूर पोलिसांत गुन्हा
समुद्रपुर तालुक्यातील जाम ते हिंगणघाट सर्विस रोडवर. ताराबाई शरद हातमोडे राहणार जाम ह्या रस्त्याने जात असताना २२ जुलै रोजी ३ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने यांच्या गळ्यातील ४८ हजार ९५८ रुपये किंमतीचे सोन्याची चैन झटका मारुन तोडून घेऊन पसार झाल्याची माहिती आज २३ जुलै रोजी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.यासंबंधी ताराबाई शरद हातमोडे यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.