समुद्रपूर: पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग, समुद्रपूर पोलिसांत ६५ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल
समुद्रपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार २१ जुलै सायंकाळी ६ वाजता उघडकीस आला असून पोलिसांकडून फरार आरोपी शोध घेत असल्याची माहिती आज २२ जुलै प्राप्त झाली आहे.याबाबत समुदपूर पोलिसात संशयीत आरोपी ज्ञानेश्वर सोनकुवर या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल देरकर करीत आहेत.