समुद्रपूर: मुसळधार पावसाने पिंपळगावशेजारील नाल्यावरील पूल दोन्ही बाजूने खचला, वाहतूकीस निर्माण आला अडथळा
समुद्रपुर तालुक्यात गेल्या तिन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार उडविला आहे मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे शेतातील बांधबंधाऱ्याचे नुकसान झाले आहे.रविवारी रात्री सुमारास पिंपळगाव शेजारी असलेल्या नाल्याला पुर आल्याने या नाल्यावरील पुल दोन्ही बाजूने खचला आहे.घटना आज सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली आहे.यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहतूकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे.केव्हा हा मार्ग बंद होईल याचा नेम नाही तरी तातडीने लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी आहे