समुद्रपूर: जाम येथील शासकीय जागेवर वैद्यकिय महाविद्यालय बांधण्याची संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
समुद्रपुर:हिंगणघाट विधानसभे करीता मंजुर झालेले शासकीय वैद्यकिय महाविद्यालय जाम येथील महाराष्ट्र शासनाची कृषी विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व्हे नंबर ३२० आराजी २० हेक्टर हे.३२ आर. जमीनीवर उभे करावे अशी मागणी आज २२ जुलै रोजी २ वाजता तालुका वैद्यकिय महाविद्यालय संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी राहुलजी कर्डीले यांना दिलेल्या निवेदन देऊन करण्यात आली आहे.आहे.निवेदन देतेवेळी तालुका वैद्यकिय महाविद्यालय संघर्ष समितीचे प्रमोद भट,महैश झोंटीग, बाबाराव थुटे,देवा धोटे आदि उपस्थित होते.