नागपूर ग्रामीण: फ्लोरींगचे काम करत असताना वीजेचा धक्का बसून मजुराचा दुर्दैवी मृत्यू
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडधामना येथील कंट्रीवाईड लॉजिस्टिक गोडावूनमध्ये ही दुर्घटना घडली.विजय टेकाम हे मशीनने फ्लोरींगचे काम करत असताना मशीनमध्ये अचानक इलेक्ट्रिक करंट आल्याने त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे ते खाली पडून बेशुद्ध झाले. त्यांना तातडीच्या उपचारासाठी मेयो हॉस्पिटल येथे नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.