वरोरा: वरोरात 'स्माइल ऑन व्हील्स' दिवाळी उपक्रमाने दिला आनंदाचा संदेश
रोटरॅक्ट क्लब ऑफ वरोराने दिवाळीच्या निमित्ताने 'स्माइल ऑन व्हील्स' उपक्रम राबवून वरोरातील नागरिकांमध्ये मोफत खाऊ वाटप केला. आकर्षक कारमधून शहरातील विविध ठिकाणी शुभेच्छा दिल्या गेल्या. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.