वाकडचे प्रसिद्ध उद्योजक तुषार भूमकर यांचे अपघात, अपघाताचा थरार सीसीटीव्ही
पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरातील प्रसिद्ध उद्योजक तुषार भूमकर यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले. ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे सुमारे रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास मिसिंग लिंक मार्गावर घडली.
प्राथमिक माहितीनुसार, तुषार भूमकर यांच्या चारचाकी वाहनाची एका ट्रकशी जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
तुषार भूमकर यांच्या निधनाची बातमी समजताच वाकड परिसरासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात शोककळा पसरली आहे. सामाजिक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. अपघाताबाबत अधिक माहिती पोलीस तपासानंतर स्पष्
Pune City, Pune | Aug 7, 2026