*“स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान व ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) अभियान – 2026* कुष्ठरोगाबाबत समाजात पसरलेले गैरसमज, अंधश्रद्धा व भीती दूर करून मानवी सन्मानाची भावना बळकट करण्याच्या उद्देशाने “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दिनांक 30 जानेवारी 2026 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याच कालावधीत ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) अभियान देखील राबविण्यात येणार असून ही दोन्ही अभियाने 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहेत.