समुद्रपूर: गिरड पेठ शिवारात भरदिवसा वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, शेतकऱ्याचे ६० हजार रुपयांचे नुकसान
गिरड पेठ शिवारात ४ शेतकरी विलास वाढई यांची ६० हजार रुपये किमतीची गाय गावातील इत्तर जनावरांसोबत चरायला गेली होती.याच वेळी झुडपात दडून असलेल्या वाघाने गायीवर हल्ला चढवित जागीच ठार घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांना मिळताच त्यांनी आपले कर्मचारी वनरक्षक पि.डी बेले, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केले.यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ योगेश राघार्तै यांनी शवविच्छेदन केले.घटनास्थळी वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने ट्रम्प कॅमेरे बसवण्यात आले आहे.