समुद्रपूर: शहर पोलीस ठाण्याचे बदली झालेल्या ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या कार्याची दखल घेऊन पत्रकार संघाच्या वतीने सत्कार
समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांची निक्तीच वर्धा येथे ट्राफिक शाखेत बदली झाली असून त्यांनी समुद्रपूर शहरासह ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले सोबतच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन समाजाला प्रबोधन केले त्यांच्या या कार्याची दखल घेऊन समुद्रपूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकारांनी पोलीस ठाण्यात जाऊन सत्कार केला.