समुद्रपूर: हिंगणघाट-उमरेड मार्गावर नाकाबंदी करुन अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई, ६ ट्रकसह दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
समुद्रपुर तालुक्यातील हिंगणघाट उमरेड मार्गावर पोलिसांनी गिरड कडून जाम कडे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ६ ट्रकवर कारवाई करीत तब्बल १ करोड ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यासंबंधी १४ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार पोलीसांना रात्री गस्ती दरम्यान गिरड कडून जाम कडे मोठ्या प्रमाणात अवैध वाळुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहितीवरून सापडा रचुन हि कारवाई केली आहे.