नागपूर ग्रामीण: नागपूरच्या गोधनी येथे क्लोरीन गॅस गळती; ५६ बाधित, प्रशासनाची तात्काळ कारवाई
नागपूरमधील गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुध्दीकरण केंद्रात क्लोरीन गॅसची गळती झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५६ नागरिक बाधित झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि एनडीआरएफच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत गळती आटोक्यात आणली.एकूण ५६ बाधित नागरिकांपैकी ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ४५ जणांवर उपचार सुरू आहेत यापैकी ८ जण आयसीयूमध्ये आहेत.