वर्धा: लहुजी शक्ती सेनेच्या 'उपवर्गीकरण' पदयात्रेसाठी वर्धा जिल्हा सज्ज; स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठीही कंबर कसली!,
Wardha, Wardha | Nov 2, 2025 लहुजी शक्ती सेनेच्या वतीने, मांतग हृदय सम्राट विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी मुंबई ते नागपूर निघालेल्या पदयात्रेतील कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी वर्धा जिल्ह्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. वर्ध्यातल्या आर्वी येथे कार्यकर्त्यांच्या जेवणाची आणि विश्रांतीची व्यवस्था जिल्हाध्यक्ष अमोलजी खंदार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे असे आज २ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार कळवले आहे