आज दि 30 नोव्हेंबर सकाळी 10 वाजता या निवडणुकीत १०० टक्के विजय काँग्रेसलाच मिळेल, असा ठाम विश्वास तांबे यांनी व्यक्त केला. याआधीही पैठण नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता राहिल्याची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, त्या काळात पैठण शहरात महत्वपूर्ण विकासकामे झाली होती. त्यात शहरातील उद्याने, स्मारके, तसेच धरणाच्या काठावर चालणारी बोटिंग सेवा यांचा विशेष उल्लेख त्यांनी केला. या सुविधा सुरू झाल्यामुळे पैठणमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली होती, असेही त्यांनी नमूद केले.