शाळांनी वह्या पुस्तके व गणवेश ठराविक दुकानातून घेण्याची सक्ती करु नये-शिवसेना.
Karanja, Washim | Jun 23, 2026 कारंजा लाड:-आज दि. २३ जून २०२६ प्राप्त माहितीनुसार, दिनांक ३० जुन २०२६ पासुन राज्यातील शाळा सुरु होत आहे अश्यावेळेस विद्यार्थ्यांची पुस्तके व ड्रेस घेण्याची लगबग सुरु झाली असुन शहरातील काही शाळा विद्यार्थ्यांवर व त्यांच्या पालकांवर शाळेतूनच अथवा शाळा सांगेल त्या दुकानातून वह्या पुस्तके व गणवेश घेण्यासाठी दबाव आणत असल्याचे काही पालकांनी स्थानिक शिवसेनेच्या शिंदे गट पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते त्यानुसार दि. २२ जुन रोजी शिवसेनेच्या वतीने माननीय गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने साहेब पंचायत समिती यांना निवेदन सादर करण्यात आले.