जालना: अपर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते मोबाईलचे वाटप*
Jalna, Jalna | Sep 24, 2026 जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेले तब्बल १६७ मोबाईल फोन पोलिसांनी शोधून काढत ते संबंधित नागरिकांना परत केले. कदीम जालना पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे मोबाईल हरवलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून, मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. जालना शहरातील गांधी चमन, रेल्वे स्थानक, रविवार बाजार, मम्मादेवी परिसर तसेच इतर विविध भागांतून मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणांचा तपास करत कदीम जालना पोलिसांनी चोरीचे मोबाईल हस्तगत के