भडगाव शेतकरी सहकारी संघाची चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीचा कार्यक्रम व संचालक मंडळाची सभा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा अध्याशी अधिकारी महेश कासार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शेतकरी सहकारी संघाच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदि राजेंद्र लालचंद परदेशी यांची तर व्हाईस चेअरमन पदि हिरामण सुखदेव पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता हाती आली आहे, प्रत्येकी दोघांचे एकमेव अर्ज आल्याने ही निवड जाहीर करण्यात आली.