नाशिक: मध्यवर्ती कारागृहात गांजा अमली पदार्थ सेवन करणाऱ्यावर अखेर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nashik, Nashik | Oct 18, 2025 ना.रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त कैद्यांकडून गांजा अमली पदार्थ सेवन करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल केला गेला होता.सदर व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाला होता.या व्हिडिओ संदर्भात दिसणाऱ्या कैद्यांची चौकशी दरम्यान सदरचा व्हिडिओ हा 2024 दरम्यान काढण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संतोष आंबेकर,गोविंदसिंग पापुलसिंग, विकास जाधव, शुभम पवळे,सुमित मोहोळ,नासिर अब्दुल फकीर खान,तबरेज उर्फ तब्बू खान असे दाखल झालेल्याची नावे आहेत.