नागपूर शहर: हुडकेश्वरमध्ये ८ वर्षीय मुलीचा विनयभंग; सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपी गजाआड : अनामिका मिर्झापुरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूर यांनी 10 जुलैला सायंकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार हुडकेश्वर परिसरात ८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या कुबेर अनिल पोहाने या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी मैत्रिणीकडे जात असताना आरोपीने तिला अडवून अश्लील चाळे केले होते. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांनी २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि अखेर हिंगणा परिसरातून त्याला ताब्यात घेतले. या धाडसी कारवाईमुळे परिसरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.