आंबिवलीतीलNRC कंपनीची धोकादायक कंपाऊंड वॉल हटवण्याचे आदेश; महापौर हर्षाली चौधरी-थविल यांची घटनास्थळी पाहणी
मुसळधार पावसानंतर दुर्घटनेची दखल; अदानी, रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश
रविवार झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिवली–बनेली रोडवरील NRC कंपनीची कंपाऊंड वॉल कोसळून झालेल्या अपघातात एक रिक्षा चालक जखमी झाला होता .या घटनेची महापौर हर्षाली विजय चौधरी-थविल यांनी गंभीर दखल घेत घटनास्थळी भेट देत अदानी समूह, रेल्वे प्रशासन आणि KDMC अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी केली. पाहणीनंतर परिसरातील धोकादायक कंपाऊंड वॉल तातडीने पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबविण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.यावेळी अदानी समूहाचे गायकवाड स केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी तसेच रेल्वेचे सोलंकी उ
Kalyan, Thane | Jul 28, 2026